बातम्या

वाढते वजन कमी करण्यासाठी टिप्स

Tips to lose weight gain


By nisha patil - 7/20/2023 7:34:27 AM
Share This News:



वाढते वजन किंवा लठ्ठपणा ही सध्याच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. आकडेवारीनुसार, जगातील सुमारे 13 टक्के लोकसंख्या या समस्येचा बळी आहे. लठ्ठपणा हे गंभीर आरोग्य समस्यांचे कारण असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.

त्यामुळे मधुमेह, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचा धोका खूप वाढतो. हेच कारण आहे की आरोग्य तज्ञ सर्व वयोगटातील लोकांना वजन नियंत्रणाची शिफारस करतात.

प्रत्येक व्यक्ती ताजेतवाने दिसण्यासाठी काही न काही करतं असतो. जेणे करून आपण फिट आणि तंदुरुस्त दिसायला हवं. आपण त्यासाठी बरंच काही करत असतो कधी डायटिंग करतो तर कधी जिम मध्ये जाऊन तासन्तास वर्कआउट करत असतो पण एवढं करून ही बघावा तसा फायदा होत नाही. आणि आपल्याला नैराश्य येते. आणि वजन परत वाढलेलेच. म्हणून आम्ही आज आपल्याला काही उपाय सांगत आहोत जेणे करून आपले वजन कमी होईल आणि आपण फिट आणि स्फूर्तीवान दिसाल.

वजन वाढण्यास कारणीभूत घटक-

आरोग्य तज्ञ म्हणतात, लठ्ठपणा सामान्यतः जास्त खाणे आणि खूप कमी हालचाल किंवा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे होतो. जर तुम्ही जास्त प्रमाणात कॅलरी, चरबी आणि मिठाई वापरत असाल, परंतु व्यायाम आणि शारीरिक हालचाली कमी असतील, तर बहुतेक अतिरिक्त ऊर्जा शरीरातील चरबी म्हणून साठवली जाते. यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो.या साठी या काही टिप्स अवलंबवा.

ताणतणाव दूर ठेवा- कधी कधी आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वागून देखील काही उपयोग होत नाही आणि वजन वाढतच राहते. त्यासाठीचे ताण तणाव घेऊ नका.

तळलेले पदार्थ कमी घ्या - आपल्या जेवण्यात तेलकट आणि तुपकट कमी खावे. तळलेल्या पदार्थामध्ये कॅलोरी जास्त प्रमाणात असते ज्या मुळे शरीरात फॅट्स वाढते आणि त्यामुळे शरीर स्थूल होतं आणि वजन वाढते.

तांदळाचा वापर कमी करा - आपल्या सर्वांचा घरात दररोज भात बनवला जातो. असे म्हटले जाते की जेवणात भात नसेल तर ते जेवण संपूर्ण नसते. पण भाताच्या सेवनाने वजन वाढते कारण भातात कॅलरी जास्त असतात. त्यामुळे वात आणि वजन दोन्ही वाढते. आपण पांढऱ्या तांदळाच्या ऐवजी ब्राऊन तांदळाचा वापर करावा. ह्यात कॅलरीच प्रमाण कमी असतं. हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ह्यामध्ये ग्लॅसिमिक इंडेक्स कमी प्रमाणात आढळतं.

आहाराच्या प्रमाणाकडे लक्ष द्या - काहीवेळा आपण वजन कमी करण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश नाही करतं आणि एखाद्या वेळा ते पदार्थ खाण्याचा मोह आवरला जात नाही आणि आपण ती खातो. पण असे केल्याने आपल्या केल्याचे सार्थक होणार नाही त्यामुळे असं करण्याचा मोह टाळा.

न्याहारी वेळेत घ्या - काही जण स्वतःला फिट दिसण्यासाठी कमी खातात. सकाळची न्याहारी सुद्धा घेत नाही का तर वजन वाढू द्यायचे नाही म्हणून. असं केल्यानं गॅस आणि पोटफुगी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. सकाळची न्याहारी पौष्टिक घेणे सर्वात उत्तम, त्यामुळे आपणास सारखी सारखी भूक लागणार नाही. आपण ओट सारखे पौष्टिक पदार्थ घेऊ शकता.

आहार वेळेवर घ्या - एकाच बसणीचे जेवण करण्यापेक्षा दिवसातून 4 ते 5 वेळा थोडं थोडं करून आहार घ्यावा. आहारात तळलेले पदार्थ घेण्यापेक्षा वाफवलेले किंवा भाजक्या पदार्थांचा समावेश करावा.


वाढते वजन कमी करण्यासाठी टिप्स