बातम्या

कोतोली क्रिकेट स्पर्धेत तिरपणचा स्पोर्टस प्रथम

Tirpana Sports First in Kotoli Cricket Tournament


By nisha patil - 3/25/2024 4:56:06 PM
Share This News:



कोतोली क्रिकेट स्पर्धेत तिरपणचा स्पोर्टस प्रथम

कै.मोहन पाटील आळवे स्पोर्टस व्दितीय

मालिकाविर कै. शशिकांत यादव वाघवे
 

पांडुरंग फिरींगे पन्हाळा : प्रतिनिधी  कै.संतोष पाटील यांची आठवण म्हणून शेतकरी सेवा मेडिकल चे मालक उत्तम लव्हटे यांनी आयोजित केलेल्या धर्मवीर संभाजी राजे चषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद भैरवनाथ स्पोर्ट्स तिरपण तर उपविजेते कै.मोहन पाटील स्पोर्ट्स आळवे यांनी पटकावले. या स्टेडियमवर उत्कृष्ट खेळ करणारा शशिकांत यादव यांचे अचानक निधन झालं त्यांना    मालिकावीर कै. शशिकांत यादव यांनी पटकावला. ही बातमी समजताच यावेळी संपूर्ण स्टेडियमवर सन्नाटा पसरला,तसेच श्रध्दांजली वाहण्यात आली.
 

बेस्ट बॅटमॅन अक्षय लाड, बेस्ट बॉलर  श्रीकांत पाटील व उत्कृष्ट सिक्सर रणजित बोळवे यांना मिळाले. स्पर्धेतील सर्वांना केशव मगर, धर्मवीर संभाजीराजे स्पोर्ट्स चे मालक रवी लव्हटे,  कर्णधार मोसीन अतार यांनी सर्वांचा सन्मान चिन्ह देवून  गौरव केला. 
  यावेळी आप्पालाल अत्तार, अनिल आंगठेकर , उत्तम लव्हटे,  सुर्णबली पत संस्थेचे मॅनेजर रवी लव्हटे,प्रा.हंबीरराव चौगुले, दशरथ फिरींगे,सुधीर पाटील, गणेश पाटील, योगेश पाटील, उदय पाटील आदीसह कोतोली परिसरातील खेळाडू, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोतोली क्रिकेट स्पर्धेत तिरपणचा स्पोर्टस प्रथम