कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली

To Congress MP Balubhau Dhanorkar Tribute to Leader of Opposition Ajit Pawar


By nisha patil - 5/30/2023 7:52:18 PM
Share This News:



मुंबई, दि. 30 :- “चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती.   त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.” अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.


कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांची श्रद्धांजली