बातम्या

सौ.सुनिता केटकाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

To Mrs Sunita Ketkale District Level Ideal Headmistress Award Announced


By nisha patil - 4/9/2023 5:45:39 PM
Share This News:



सौ.सुनिता केटकाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील डीकेटीई शिक्षण संस्थेच्या अनंतराव भिडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता विजय केटकाळे यांना कोल्हापूर इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाच्या वर्षीचा जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर करण्यात आला.नुकताच असोसिएशनच्या वतीने त्यांना सदर पुरस्कार निवडीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.

अनंतराव भिडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता  केटकाळे यांनी सर्व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच  विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर‌ सातत्याने भर दिला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच
कोल्हापूर इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनच्या वतीने त्यांची यंदाच्या वर्षी जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच कुंभोज येथे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्मारक परिसरातील कर्मवीर अध्यासन केंद्रात विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे कोल्हापूर इंग्लिश मिडीयम स्कूल असोसिएशनच्या वतीने पञाव्दारे सांगण्यात आले.सदरचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्याध्यापिका सौ.सुनिता केटकाळे यांचे शैक्षणिक क्षेत्रासह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


सौ.सुनिता केटकाळे यांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार जाहीर