बातम्या

ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

To Senior Narrator Amin Sayani Tribute to Deputy Chief Minister Ajit Pawar


By nisha patil - 2/21/2024 1:05:32 PM
Share This News:



ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने
रेडीओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट हरपला
- उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी
- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडीओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानींनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडीओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीतरसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडीओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.


ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली