बातम्या
शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा - जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण
By nisha patil - 6/21/2024 12:16:30 PM
Share This News:
शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्याकरिता आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक आहे. शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न (Aadhar Seeded) करण्यासाठी आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा. आपल्या अडचणींबाबत जर पुरवठा शाखेतून दखल घेतली जात नसेल तर संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयान्वये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शासन निर्णयान्वये निर्धारित केलेल्या घटकांमध्ये 28 जुलै 2023 च्या शासन निर्णयान्वये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी घटकामध्ये शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा देखील समावेश करण्यात आला आहे.
शुभ्र शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करण्यासाठी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधा - जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण
|