बातम्या
आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
By nisha patil - 6/19/2024 8:31:35 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. 19 : केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दरवर्षी दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, नेहरु युवा केंद्र व पंतजली योगपीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून 2024 रोजी सकाळी 6.45 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे योग दिन साजरा करण्यात येत आहे. सर्व नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, खेळाडू यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
|