बातम्या
वापर करायचा अन् नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकायचं - विनायक राऊत
By nisha patil - 2/15/2024 5:43:39 PM
Share This News:
मुंबई : भाजपाच्या नितीचा प्रत्यय नारायण राणेंना आला आहे. जोपर्यंत वापर आहे तोपर्यंत वापर करायचा नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचे. भाजपने नारायण राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. दुदैव एवढंच आहे की, अशोक चव्हाण यांना राज्यसभेची जागा दिली. त्यापेक्षा एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला हे दिलं असते तर ते भाजपला शोभले असते, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.
ज्या अशोक चव्हाण यांना कंटाळून नारायण राणे दूर गेले. त्यांच्याच सोबत आता नारायण राणेंना काम करावे लागणार आहे. शिंदे गटाची अवस्था वाईट होणार आहे. येत्या काही दिवसात शिंदे गटाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जाणार आहेत. कोट्यावधी रुपयांचे आरोप असतात ते भाजपवासी झाले की, ते धुतल्या तांदुळाप्रमाणे होतात. सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षणमिळालं पाहिजे, जरांगेच्या जिवाशी सरकार खेळतंय. त्यांची विचारफुस करायला देखील ते जात नाहीत. नारायण राणे जरांगेबद्दल जे बोलले ते अयोग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
वापर करायचा अन् नंतर कचऱ्याच्या डब्यात फेकायचं - विनायक राऊत
|