बातम्या

शरीरात कॅल्शिअम वाढवायचंय, 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश

To increase calcium in the body


By nisha patil - 5/2/2024 7:37:04 AM
Share This News:



आपल्या शरीरातील ७० टक्के हाडे कॅल्शियम फॉस्फेटपासून बनलेली असतात. हेच कारण आहे की, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. वाढत्या वयानुसार कैल्शियम कमी होत असते.

बऱ्याच वेळा शरीरात कॅल्शियमची कमतरता भासते. शरीरातील कॅल्शियम वाढवण्यासाठी विविध औषध उपचारदेखील घेतले जातात.

आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून आपण शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढू शकतो. साधारण वयाच्या चाळिशीनंतर हे घडते, कैल्शियमची कमतरता दूर करून हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शिअमयुक्त आहार घेणे आवश्यक असते.

'हे' पदार्थ आहेत महत्वाचे...

१.सोयाबीन : सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. जे लोक विगन डाएट फॉलो करतात त्यांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे.

२. पनीर : हे दुधापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ आहे. जे आपल्या शरीरासाठी कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. मोझरेला चीज विशेषतः कॅल्शियममध्ये जास्त असते आणि ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असते. आरोग्याच्या परिणामासाठी आपण स्किम दुधापासून तयार केलेले पनीरदेखील वापरू शकता. ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

३. दही : हे कॅल्शियमचं एक उत्तम स्त्रोत आहे. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार दही हे प्रोबायोटिक्सचा चांगला स्त्रोत आहे. यात गुड बॅक्टेरियाज असतात, ज्यामुळे इम्यून फंक्शन बूस्ट होण्याबरोबरच हृदयाचे आरोग्य सुधारते. यामुळे शरीरातील पोषक तत्त्वांची कमरता दूर होण्यासही मदत होते.

४. पालेभाज्या : पाल आणि केल यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. फूड डेटा सेंट्रलनुसार १ कप कोलाई ग्रीन ही भाजी खाल्ल्याने २१ टक्के कॅल्शियम मिळते. पालकाची भाजी ऑक्सलेटने परिपूर्ण असते. ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमचे अवशोषण वाढते.


शरीरात कॅल्शिअम वाढवायचंय, 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश