विशेष बातम्या

चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा.

To live a good and healthy life do these things when you


By nisha patil - 7/8/2023 8:40:33 AM
Share This News:



 तुमच्या जीवनशैलीचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, म्हणूनच प्रत्येकाला निरोगी दिनचर्या पाळण्याचा सल्ला दिला जातो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जाणून-बुजून अशा अनेक गोष्टी करत असतो, ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्यापैकी बहुतेकजण अशा अनेक चुका करतात, विशेषत: सकाळच्या वेळी, ज्यांचे दीर्घकालीन परिणाम खूप हानिकारक असू शकतात.

आरोग्य तज्ञांच्या मते, चांगल्या सवयींनी दिवसाची सुरुवात केल्याने त्याचे आरोग्य फायदे तर मिळतातच, पण तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यात आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते. पण आपण सकाळी उठल्यानंतर कोणत्या चांगल्या आणि आरोग्यदायी सवयी पाळायला हव्यात चला तर, याबद्दल जाणून घेऊया…

1. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी पाणी प्या कारण रात्री 7 ते 8 तास आपलं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं त्यामुळे उठताच पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचं. कोमट किंवा लिंबू पाणी प्यायल्यास उत्तम राहील.

2. सकाळी लवकर उठून मेडिटेशन करा फक्त 10 मिनिटांच्या मेडिटेशनने तुम्ही मेंदूला आराम आणि शांत करू शकता. मेडिटेशनने तुमचा दिवस अधिक कार्यक्षम जातो आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल.

3. सर्वात महत्वाचे म्हणजे, तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा तुमचा दिवसभराचा दिनक्रम लिहा. तुम्ही डायरीमध्ये दिवसभराचं तुमचं वेळापत्रक लिहू शकता. लिहिण्याने विचारांमध्ये सुसूत्रता येते.

4. शक्य असल्यास सकाळी सूर्यप्रकाश घ्या, व्हिटॅमिन डी घ्या, जेणेकरून तुमचा दिवस आनंदी जाईल.

5. सकाळी फ्रेश झाल्यानंतर तुमच्या आवडीचा नाश्ता करा. वरील पैकी काहीही तुम्ही विसरू शकता पण चुकूनही नाश्ता करणे विसरू नका. सकाळचा नाश्ता हा पोट भर करा.

6. सकाळी उठल्या-उठल्या चुकूनही तुमचा फोन चेक करू नका. तुमचे ईमेल, फोन कॉल्स, मेसेज हे सगळं उठल्या उठल्या चेक करायची गरज नाही. याचा तुमच्या मानसिकतेवर देखील परिणाम होऊ शकतो.

7. सकाळी उठल्यावर तुम्ही वाचनासाठी देखील वेळ द्यायला हवा. वर्तमानपत्र वाचन असो किंवा एखादं पुस्तक रोज वाचत जा, त्यातून तुम्हाला नवीन गोष्टींची माहिती होईल.


चांगले आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी नक्की करा; होईल खूप मोठा फायदा.