बातम्या
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 3 ऑगष्टपर्यंत मुदतवाढ
By nisha patil - 7/31/2023 7:40:12 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. 31 : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतक-यांना आता केवळ एक रूपयात पिकांचा विमा उतरता येणार आहे. यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत 'सर्वसमावेशक पिक विमा योजना' सुरू केलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षाच्या खरीप हंगामातील पिकापासून करण्यात आलेली आहे. पिकाचा विमा उतरण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करता येणार होते. तथापी केंद्रशासनाने योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 3 ऑगष्ट 2023 अखेर मुदतवाढ दिलेली आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी कळविले आहे.
गतवर्षी सन 2022-23 मध्ये 5 हजार 442 शेतकऱ्यांनी 1 हजार 348 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग घेतला होता. सन 2023-24 खरीप हंगाममध्ये फक्त 1 रूपाया भरून योजनेत सहभागी होता येत असल्याने दिनांक 30 जुलै 2023 अखेर जिल्ह्यातील 31 हजार 222 शेतक-यांनी 8 हजार 738 हेक्टर क्षेत्रासाठी सहभाग घेतला आहे. दिनांक 3 ऑगष्ट 2023 पर्यत मुदतवाढ मिळाल्याने जिल्हातील सर्व शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे. पिकाच्या नुकसानीच्या काळात शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबादित राखणे, नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषि क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे. उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणी कृषि क्षेत्राचा गतिमान विकास करणे , स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होणार,
हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थीतीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान. हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे होणारे नुकसान. पीक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीतील होणारे नुकसान नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पिक क्षेत्र जलमय होणे (भात पिक वगळून) भूस्खलन , दुष्काळ, पावसातील खंड, किड रोग आदी बाबीमुळे उत्पादनात होणारी घट. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान. नैसर्गिक कारणामुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान.या घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक माहीतीसाठी तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, युनिव्हर्सल सोंपो इन्शुरन्स कंपनीचे तालुका व जिल्हा प्रतिनिधी, राष्ट्रीयकृत बॅंका, महा-ई सेवा केंद्र, सर्व सेवा केंद्र(सी.एस.सी.) यांच्याशी संपर्क साधावा, अंतिम वाढीव मुदतीपूर्वी पिक विमा पॉलिसी उतरून योजनेचा लाभ घ्यावा.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी 3 ऑगष्टपर्यंत मुदतवाढ
|