विशेष बातम्या
आजरांपासून बचाव करायचा असेल तर रोज सकाळी फक्त 1 सफरचंद खा
By nisha patil - 5/29/2023 6:58:26 AM
Share This News:
सफरचंद हे सर्व हंगामातील फळ आहे. यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, फायबर, लोह, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बँक्टेरियल गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत रोज सफरचंद खाल्यास प्रतिकारशक्ती वाढते. रोगांपासून बचाव करण्याबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकासास मदत होते. यासाठी एक म्हण देखील आहे, ‘एन अँपल ए डे, किप्स द डॉक्टर अवे’. म्हणजेच रोज एक सफरचंद खाल्याने आजार दूर राहतात. विशेषतः रिकाम्या पोटी सफरचंद खाणे फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया सफरचंद खाण्याचे फायदे…
डोके निरोगी आणि शांत राहते
पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने डोके शांत राहते. मेंदूच्या पेशी सुरक्षित ठेऊन अल्झायमरचा धोका कमी होतो.
कर्करोगास प्रतिबंध
सफरचंदमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या घटनेस प्रतिबंध करतात. अशा परिस्थितीत आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे.
मधुमेहाचा धोका कमी होतो
सफरचंदाचे सेवन केल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. सफरचंदामध्ये उपस्थित पौष्टिक आणि अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म शरीरात ग्ल्युकोजची कमतरता दूर करण्यास मदत करतात.
हृदयासाठी फायदेशीर
सफरचंद किंवा सफरचंदाचा ज्यूस सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. अशा परिस्थितीत हे निरोगी हृदय ठेवण्यास मदत करते. तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या आजारांना बळी पडण्याचा धोका कमी असतो.
वजन कमी होते
फायबरने समृद्ध असलेले सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे खाल्यास पोट भरलेले राहते त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
पचन यंत्र मजबूत करा
सफरचंदामध्ये उपस्थित पोषक तत्व पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामध्ये असलेले डायट्री फायबर्समुळे पोट स्वस्थ ठेवण्यासोबत गॅस, ऍसिडिटी, कब्जच्या समस्येमध्ये आराम मिळतो. यासोबत प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो.
दात मजबूत होतात
सफरचंद खाल्याने तोंडात असलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस दूर होतात. त्यामुळे दात स्वस्थ असल्याने पायरियाचा त्रास होत नाही.
हाडे मजबूत होतात
सफरचंदमध्ये असलेले कॅल्शियममुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. अशा परिस्थितीत थकवा, अशक्तपणा दूर होऊन चांगला शारीरिक विकास होण्यास मदत होते.
सुंदर त्वचा
रोज १ सफरचंद खाल्याने त्वचेला पोषण मिळते. अशात चेहऱ्यावर डाग, डार्क सर्कल्स, मुरूम आल्यास ही समस्या दूर होईल. चेहरा स्वच्छ, मुलायम आणि सुंदर दिसेल
आजरांपासून बचाव करायचा असेल तर रोज सकाळी फक्त 1 सफरचंद खा
|