विशेष बातम्या
दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा व आरोग्य सेवा देणार : ना. प्रकाश आबिटकर
By nisha patil - 1/27/2025 9:38:16 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका व ०३ व्हॅक्सीन व्हॅनचे लोकार्पण शेंडा पार्कमध्ये ना. प्रकाश आबिटकर व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आबिटकर बोलताना म्हणाले, कोल्हापूर जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा व आरोग्य सेवा देणे सोयीचे होण्यासाठी आवश्यक सुविधा वाढविण्यास नेहमीच प्राधान्य देणार आहे.
आरोग्य विभागातील रुग्ण सेवेचा दर्जा वाढविणेसाठी, दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सुविधा देणेसाठी राज्यस्तरीय अनुदानांतुन या रुग्णवाहिका देणेत आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द पिंपळे, यांच्यासह प्रमुख मान्यवर व जिल्हयातील आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा व आरोग्य सेवा देणार : ना. प्रकाश आबिटकर
|