बातम्या
वाहतूक कोंडीवर तोडगा काढणेसाठी पॅसेंजर वाहतूक ठेवली बंद
By nisha patil - 1/11/2023 4:24:20 PM
Share This News:
कोल्हापुरात सीबीएस स्टँड हा परिसर नेहमी पॅसेंजरने गजबजलेला असतो या परिसरात व्यावसायिक रिक्षा स्टँड आहेतपाटणू काही रिक्षा चालक जे व्यावसायिक नाहीत ते तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या ट्रॅफिक नियमांचे पालन न करता बेफिकिर पणे स्टँड परिसरातील महादेव मंदिर ते रिक्षा स्टॉप येथील वन वे तोडून पॅसेंजर भरवतात . त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. वारंवार सूचना देऊनही ते वाहतुकीचे नियम पळत नाहीत
याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा चालक संघटनेच्या वतीने तसेच एस. टी. स्टँड येथील रिक्षा चालकांनी स्टँड परिसरातील पॅसेंजर वाहतूक काही काळ बंद ठेवली होती.यानंतर तेथे असणाऱ्या शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चर्चेनंतर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
यावेळी सुनील कांबळे, कोमल देसाई, अजित हेगडे , अविब आंद्रे, सूरज चौगले यांच्यासह रिक्षा चालक आणि संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वाहतूक कोंडीवर तोडगा काढणेसाठी पॅसेंजर वाहतूक ठेवली बंद
|