बातम्या
संघटनेच्या मागण्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करणे
By nisha patil - 1/3/2024 10:58:58 PM
Share This News:
उपरोक्त विषयानुसार तक्रारदार/अर्जदार यांचेकडील उपोषण आंदोलनाच्या अनुषंगाने संदर्भातील
पत्रान्वये आपले कार्यालयास योग्य त्या कार्यवाहीसाठी कळविणेत आलेले आहे. त्याचप्रमाणे पुढीलप्रमाणे मुद्यांच्या
अनुषंगाने नियानुसार सत्वर योग्य ती कार्यवाही करणेत यावी.
१) ग्रामसेवक श्रीमती तब्बसूम आत्तार यांचे वरील शिस्तभंगाचा प्रस्ताव तातडीने पाठवण्यात यावा व
सदरच्या प्रस्तावाची प्रत उपोषणकर्त्यास देणेत यावी.
२) ग्रामपंचायत खुपिरे येथील अतिक्रमण निष्काशन स्थगिती आदेश नसल्याची खात्री करुन निष्कासनाची
कारवाई करण्यावी यावी.
३) ग्रामपंचायत चिंचवडे येथील पानंर रस्ते शेजारी सुरु असणाऱ्या बांधकामाबाबत आवश्यक ती
कागदपत्रांची तपासणी करुन शासकीय मोजणी हद्द कायम झाले खेरीज बांधकाम करण्यात येऊ नये
याची खात्री खबरदारी घ्यावी.
४) ग्रामपंचायत चिंचवडे गट नंबर ६६८ व त्यालगत पानंदीची मोजणी वेळी कायदा व सुव्यवस्था बिघडणार
नाही याकरीता पोलीस बंदोबस्त ठेवणेत यावा.
वरीलप्रमाणे १ ते ४ मुद्याबाबत आपलेस्तरावरुन संबंधित ग्रामपंचायतीला सुचना देवून उचित
कार्यवाही करणेत यावी हि विनंती.
संघटनेच्या मागण्या संदर्भात तात्काळ कार्यवाही करणे
|