बातम्या

सभासद कल्याण व विमा योजनेतून मयत सभासदांचे वारसांना रुपये 6 लाख 61 हजारचे अर्थसहाय्य प्रदान

To the heirs of the deceased members under the members welfare and insurance scheme


By nisha patil - 3/8/2024 8:59:53 PM
Share This News:



कोल्हापूर दि. 03 : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे सभासद गवसे संभाजी तुकाराम यांनी पतसंस्थेकडून रक्कम रुपये दहा लाख रकमेचे कर्ज घेतले होतेत्यांनी पतसंस्थेचे कर्ज मंजुरी धोरणानुसार सभासद कल्याण ठेव योजना  विमा योजनेमध्ये सहभागघेतलाहोता.त्यांचेदिनांक11/5/2024 रोजी आकस्मित निधन झाले .त्यांनी वरील योजनांमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांचे वारसांना कल्याण ठेव योजनेमधून रक्कम रुपये दोन लाख  विमा योजनेतून रक्कम रुपये सहा लाख इतके अर्थसहाय्य उपलब्ध झाले .

सदर रकमे मधून  संस्थेकडील कर्जाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रुपये 6 लाख 61 हजार इतक्या रकमेचा चेक त्यांचे वारसांना शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष  संस्था कुटुंबप्रमुख मा.प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सदरसमयी पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र सुर्याजीराव साळुंखे उपस्थित होते .

 प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांनी आपल्या मनोगतामध्ये पतसंस्थेकडून उपलब्ध केलेल्या योजनांमुळे एखाद्या सभासदांचे आकस्मित निधन झाल्यास सभासदांच्या पश्चात त्यांच्या वारसांना मिळणाऱ्या अर्थसाहयाचा अत्यंत गरजेचा मार्ग उपलब्ध करून संबंधित वारसांना देण्यात येणाऱ्या साह्याचा विचार करता ही योजना अत्यंत उपयुक्त  गरजेची आहेत्यामुळे पतसंस्थेच्या जास्तीत जास्त सभासदांनी या दोन्ही योजनांमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले.


सभासद कल्याण व विमा योजनेतून मयत सभासदांचे वारसांना रुपये 6 लाख 61 हजारचे अर्थसहाय्य प्रदान