बातम्या

आज आयकर भरण्याची शेवटची तारीख

Today is the last date to file income tax


By nisha patil - 7/31/2023 1:25:57 PM
Share This News:



आयकर भरण्यासाठी सरकारकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. आयकर भरण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक असून, रविवार 30 जुलै पर्यंत सुमारे सहा कोटी प्राप्तिकर रिटर्न ITR भरण्यात आले आहेत, अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे. 31 जुलै 2023 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही अद्याप आयकर भरला नसेल, तर लवकरात लवकर भरुन घ्या.

असा भरा ITR 

आयकर रिटर्न भरण्यासाठी सर्वप्रथम ई-फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in ला भेट द्या. तुमचे आधीच खाते असेल तर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. खाते नसल्यास लॉगईनचा ​​पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला होमपेजवर e-file चा पर्याय निवडावा लागेल आणि File Income Tax Return चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर वर्ष निवडा आणि आपला आयटीआर भरा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला योग्य फॉर्म निवडावा लागेल.

तुम्ही नोकरी करणारे असाल तर ITR-1 फॉर्म निवडावा लागेल. पगारदार करदात्याला आधीच भरलेला फॉर्म मिळेल. याच्या मदतीने तुम्ही सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि AIS मधील डेटा मर्ज करू शकता. रिटर्नचा दावा करण्यापूर्वी तुमचे बँक तपशील तपासा. सर्व आवश्यक गोष्टी तपासल्यानंतर, तुम्हाला ITR सबमिट करावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर आयटीआरला ई-व्हेरिफिकेशन करावे लागेल. पावती क्रमांकाच्या मदतीने तुम्ही तुमची स्थिती सहज तपासू शकता.


आज आयकर भरण्याची शेवटची तारीख