राशिभविष्य
आजचे राशिभविष्य १९ ऑक्टोबर २०२३
By nisha patil - 10/19/2023 7:17:21 AM
Share This News:
मेष राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागण्यास येऊ शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या अथवा धन हानी होऊ शकते.
वृषभ राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
पैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करु नका.
मिथुन राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. आज दिवसभर तुम्ही आपल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनुभव घ्याल.
कर्क राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे.
सिंह राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. ऐतिहासिक स्थळांवर कुटुंबाची छोटीशी पिकनिक प्लॅन करा. त्यामुळे आपल्या कुटुंबियांना आणि मुलांच्या नीरस आयुष्यात घटकाभर मोकळीक मिळेल.
कन्या राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात
तुळ राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरातील संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल.
वृश्चिक राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून शारीरिक क्रिया करून त्यावर मात करा. विचित्र छळणारी परिस्थिती सोडून देणेच इष्ट ठरेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील.
धनु राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाही. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे! आपल्या व्यवसाय आणि शिक्षणाचा कोणालातरी फायदा होईल.
मकर राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल - कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल.
कुंभ राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौजमजा करण्याचे बेत ठरवा. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल.
मीन राशी भविष्य (Thursday, October 19, 2023)
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा.
आजचे राशिभविष्य १९ ऑक्टोबर २०२३
|