बातम्या

शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द

Today s visit of Sharad Pawar to Solapur Madha was suddenly cancelled


By nisha patil - 10/23/2023 4:25:39 PM
Share This News:



शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द 

दौरा रद्दचे कारण अद्याप अस्पष्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार ही  आज  माढा दौऱ्यावर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा   आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिलीय.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा  आजचा नियोजित सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया आघाडीच्या कोअर कमिटीच्या बैठकीमुळे दौरा पुढे ढकलल्याची माहिती समोर येत आहे.  यातच उपमुख्यमंत्री अजित पवार ही   आज सोलापूर जिल्ह्यातील माढाच्या दौऱ्यावर आहेत. मात्र अजित पवारांच्या माढा दौऱ्याला माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने विरोध केलाय.  
     

शरद पवार यांच्या माढा दौऱ्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आजच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी देखील आयोजकांकडून करण्यात आली होती. मात्र शरद पवारांचा दौरा अचानक रद्द झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे सध्या बारामतीत आहे. बारामतीतून सोलापूरला न जाता शरद पवार थेट पुण्याला जाणार आहेत. दौरा का रद्द करण्यात आला याची कोणतेही कारण समोर आले नाही.


शरद पवारांचा आजचा सोलापूर, माढा दौरा अचानक रद्द