राशिभविष्य

आजचे राशिभविष्य ११ मार्च २०२४

Todays Horoscope 11 March 2024


By nisha patil - 11/3/2024 7:27:58 AM
Share This News:



मेष राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
जेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो.

वृषभ राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे. 

मिथुन राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा - आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता.

कर्क राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. गर्लफ्रेंड तुम्हाला धोका देऊ शकते. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात, त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. 


सिंह राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर, तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. मुलं तुम्ही लक्ष देण्याची अपेक्षा करतील, अर्थात त्यातून तुम्हाला आनंदच मिळेल. तुमचा/तुमची प्रियकर/प्रेयसी दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. 

कन्या राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनेल.. 


तुळ राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. 

धनु राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल.

मकर राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही होईल आणि आश्चर्य वाटेल. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. 

कुंभ राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे.

मीन राशी भविष्य (Monday, March 11, 2024)
चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल.


आजचे राशिभविष्य ११ मार्च २०२४