राशिभविष्य

आजचे राशिभविष्य १२ मार्च २०२४

Todays Horoscope 12 March 2024


By nisha patil - 12/3/2024 7:19:24 AM
Share This News:



मेष राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. परंतु स्वार्थी व लगेच चिडणाºया व्यक्तीला टाळा, कारण ती व्यक्ती तुम्हाला तणावात टाकू शकते - परिणामी समस्या अधिकच गंभीर रूप धारण करू शकेल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात.


वृषभ राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. प्रेमी युगुलांनी आपल्या कुटुंबांच्या भावनाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. संधी येण्याची, काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका, त्याऐवजी स्वत:हून नव्या संधींचा शोध घ्या.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल.


कर्क राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा - आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. 

सिंह राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल तर असेलच पण आपल्यासाठी खूपच मनोरंजक ठरेल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे.

कन्या राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही - कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. सकारात्मक विचारांच्या आणि पाठिंबा देणा-या मित्रांबरोबर बाहेर जा. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल 

तुळ राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. 

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. 

धनु राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरातील सणांचे उत्सवाच वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. 

मकर राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. तुम्हाला त्याकडील त्वरित लक्ष द्याावे लागेल. योग्य तो वैद्याकीय सल्ला घ्या, छोटेसे दुर्लक्षदेखील प्रश्न गंभीर करू शकते. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल 

कुंभ राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. पाहताक्षणी तुम्ही प्रेमात पडण्याची शक्यता आहे.


मीन राशी भविष्य (Tuesday, March 12, 2024)
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल. समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल.


आजचे राशिभविष्य १२ मार्च २०२४