राशिभविष्य

आजचे राशिभविष्य २५ मे २०२३

Todays Horoscope 25 May 2023


By nisha patil -
Share This News:



मेष राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. नवजात बालकांचा आजार तुम्हाला व्यस्त ठेवल. 

वृषभ राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. 

मिथुन राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील.

कर्क राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका


सिंह राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. भावनिक धोका पत्करणे लाभदायक ठरेल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात.

कन्या राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही खुप काही करत असाल तरी ते तुमच्यावर नाराज असतील. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात.

तुळ राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. 

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. 

धनु राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात.


मकर राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. 

कुंभ राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुम्ही वेळीच योग्य ती मदत केल्याने एखाद्याचे नशिबाचे भोग टळतील. 

मीन राशी भविष्य (Thursday, May 25, 2023)
इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. - तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम वाटण्यासाठी तुम्हाला आवडणाºया गोष्टी करा. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकतात तथापि, स्थिती लवकरच सुधारेल.


आजचे राशिभविष्य २५ मे २०२३ speednewslive24#