राशिभविष्य

आजचे राशिभविष्य ७ ऑगस्ट २०२३

Todays Horoscope 7 August 2023


By nisha patil - 7/8/2023 8:33:49 AM
Share This News:



मेष राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा - आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा.

वृषभ राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा.


मिथुन राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. 

कर्क राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. 

सिंह राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. स्वत:ला घरगुती कामात गुंतवून घ्या. त्याचवेळी उत्साह येण्यासाठी आणि कामाचा वेग टिकून राहण्यासाठी मनाला रिझविणाºया गोष्टींवर थोडा वेळ खर्च करा.


कन्या राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
तुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. 

तुळ राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. 

वृश्चिक राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. 

धनु राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिलेत तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा.

मकर राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. येनकेन प्रकारे आर्थिक लाभ होतील. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

कुंभ राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. थोड्या फार अडचणींच्या व्यतिरिक्त ही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल.

मीन राशी भविष्य (Monday, August 7, 2023)
तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या पालकांना तुमच्या महत्त्वाकांक्षांबद्दल सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. ते तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील.


आजचे राशिभविष्य ७ ऑगस्ट २०२३