बातम्या

विवेकानंद कॉलेजची कु.ज्ञानेश्वरी पाटील हिची नॅशनल चॅम्पीयनशीपमध्ये अव्वल कामगिरी

Top performance of Ms Dnaneshwari Patil of Vivekananda College in National Championship


By nisha patil - 7/12/2023 7:37:18 PM
Share This News:



कोल्हापूर  विवेकानंद कॉलेजमधील एम.एमस्सी.कॉम्प्यूटर सायन्स भाग-1 वर्गातील कु.ज्ञानेश्वरी जयवीर पाटील हिने दिल्ली येथे दिनांक 15 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या 66व्या नॅशनल शुटींग चॅम्पीयनशीप स्पर्धेमध्ये 01 सिल्व्हर आणि 02 ब्राँझ पदकांची कमाई करुन घवघवीत यश संपादन केले.

या यशाबद्दल त्याचे   श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा. प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ईओ. श्री कौस्तुभ गावडे ,  विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी अभिनंदन केले  व  शुभेच्छा दिल्या.  

 कु.ज्ञानेश्वरी पाटील हिला  जिमखाना प्रमुख प्रा.हवलदार एन.आर.सणगर, प्रा सहिदा कच्छी, प्रा संतोष कुंडले, प्रा समिर पठाण  यांचे बहुमोल मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.   या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


विवेकानंद कॉलेजची कु.ज्ञानेश्वरी पाटील हिची नॅशनल चॅम्पीयनशीपमध्ये अव्वल कामगिरी