बातम्या
जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
By nisha patil - 1/20/2025 10:12:35 PM
Share This News:
जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही प्रांतातील परस्पर संबध अधिक वृध्दींगत होतील, असे मत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.
जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने पावनगड येथे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानचे वाकायामा प्रातांचे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे संचालक योशीओ यामास्ताचे, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामाचे सोनोबे सॅन, महिरा हेदुयेकी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सुर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधिक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिष्टमंडळाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून जाणून घेतली. एप्रिल महिन्यात महाबळेश्वर येथे होणाऱ्या पर्यटन महोत्सवास जरुर यावे.असे आग्रहाचे निमंत्रणही पर्यटन मंत्री श्री.देसाई यांनी दिले.
जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
|