बातम्या

विद्या मंदिर तळवडे येथे पारंपारिक पाककृती दिन जल्लोषात साजरा...

Traditional Culinary Day is celebrated with gusto at Vidya Mandir Talwade


By nisha patil - 9/21/2024 3:25:01 PM
Share This News:



दिनांक 20 सप्टेंबर रोजी विद्या मंदिर तळवडे येथे पारंपारिक पाककृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या युगात आणि फास्ट फूडच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर, पारंपारिक व पोषणमूल्य असलेल्या पदार्थांचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता. विद्या मंदिरच्या सौ. भारती पाटील मॅडम आणि सौ. वैष्णवी रेडीज मॅडम यांच्या संकल्पनेतून अंगणवाडी ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मातांनी पारंपारिक पदार्थ शाळेत आणून हा कार्यक्रम राबविला.

कार्यक्रमात रानभाज्या, नाचणीचे पदार्थ, तांदळाचे विविध पदार्थ अशा पौष्टिक खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या उपक्रमामुळे ग्रामीण खाद्यसंस्कृतीची विविधता आणि पोषणमूल्य अधोरेखित करण्यात आली. पारंपारिक पदार्थ बनवताना वापरल्या जाणाऱ्या स्थानिक पिकांच्या महत्त्वाची जाणीव पालक आणि विद्यार्थ्यांना झाली.

कार्यक्रमाच्या समारोपात सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला. अंगणवाडी सेविका माने बाई, घावरे बाई आणि पत्रकार उज्वला लाड यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमाने महिलांना विविध पाककृती जाणून घेण्याची संधी मिळाली.


विद्या मंदिर तळवडे येथे पारंपारिक पाककृती दिन जल्लोषात साजरा...