बातम्या
आदर्श गुरुकुल संकुलात पारंपारिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा.
By nisha patil - 4/10/2024 1:58:29 PM
Share This News:
पेठवडगाव येथीलआदर्श गुरुकुल संकुलात पारंपारिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेमध्ये आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने फेटे बांधणे प्रात्यक्षिक ही करण्यात होते . सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळी पारंपारिक दिनाचे महत्त्व पारंपारिक लोकसंस्कृती पारंपरिक पद्धती मानस या निमित्ताने करण्यात आला.
नवरात्र उत्सवामध्ये या पारंपारिक दिनाचे महत्त्व असते. या माध्यमातून आपण देवीचा देवीचा जागर करत असतो . म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांनी या वेशभूषेमध्ये दांडिया नृत्य सादर करून नवदुर्गेचा जागर केला यानिमित्ताने सर्व शिक्षक बंधू भगिनी पारंपारिक वेशभूषेमध्ये झाले होते. यानिमित्त खास आकर्षण सद्गुरु श्री बाळूमामा तसेच पारंपारिक शेतकरी वेशभूषेत विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. डी .एस , घुगरे सर, संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका सौ ,एम ,डी, घुगरे मॅडम ,मुख्याध्यापक आर .बी .शिवाई सर प्रशासन अधिकार ए.डी .खोंद्रे सर प्रशासक. एम,एच ,चौगुले सर सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदर्श गुरुकुल संकुलात पारंपारिक वेशभूषा दिन उत्साहात साजरा.
|