बातम्या
पन्हाळगडावर पारंपारिक दसऱ्याची भर पावसात पालखी
By nisha patil - 10/13/2024 6:07:07 PM
Share This News:
आज दरवर्षीप्रमाणे श्री देवी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर पन्हाळा व करवीर छत्रपती संभाजी महाराज मंदिर या या ठिकाणी सोने लुटणे हा कार्यक्रम पार झाला त्यानंतर संभाजी मंदिर मधून दोन पालख्या दरवर्षी प्रमाणे महालक्ष्मी मंदिर इथून निघून संभाजी महाराज मंदिरात येते इथे मग दोन्ही पालख्या या बाराहीमान दर्ग्या मार्गे वीर शिवा काशीद यांच्या समोर असणारी जागा तालीम या ठिकाणी येते, इथे सोने लुटून झाल्यानंतर पन्हाळा गडावरील दर्गा हजरत, पीर,शहादुद्दीन खताल्लवल्ली या ठिकाणी मुजावर लोकांनकडून मानाचा नारळ दिला जातो. व हार पालखींना घातले जातात .मंदिर चा मानाचा नारळ घेतला जातो . ही परंपरा छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली आहे. ही परंपरा आत्तासुद्धा पन्हाळगडावरच्या हिंदू मुस्लिम रहिवासांनी ही जोपासली आहे. यावेळी छत्रपतीचे सेवक नगारजी लोक ताशाच्या-नगाराच्या गजरात ही पालखी सलामी देत.पुढे पुढे जात असते.दर्ग्यापासून सरळ बाजीप्रभू पुतळा येथे थांबते. पुन्हा या ठिकाणी सोने लुटले जाते.
त्यानंतर सज्जाकोटी या इमारती जवळ सोने लुटले जाते.तसेच महाराणी ताराबाई राजवाडाच्या दारात शेवटचे सोने लुटले जाते. पुन्हा ही पालखी महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी येते,व छत्रपती संभाजी मंदिर ची पालखी परत संभाजी मंदिरामध्ये परत आगमन होते. पन्हाळगडावरील दसऱ्याच्या पालखीची सांगता होते.पन्हाळगडावरील सर्व लोक इथून पुढे मग एकमेकांना सोने देतात. सोने घ्या सोन्यासारखे रहा असे शुभेच्छा देतात.
यावेळी पन्हाळ्यातील ज्येष्ठ नागरिक, भीमराव काशीद ,पृथ्वीराज भोसले, मारुती माने, रवींद्र धडेल, संदीप लोटलीकर, शरयू लाड सर दर्गा ट्रस्टी, अब्दुल सत्तार मुजावर, शयुब मुजावर, सद्दाम मुजावर, इमरान मुत्तवल्ली , शब्बीर मुत्तवल्ली, हनीफ नगारजी, इम्तियाज मुजावर ,आदी उपस्थित होते.
पन्हाळगडावर पारंपारिक दसऱ्याची भर पावसात पालखी
|