बातम्या

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतू सुरु मात्र गगनबावडा मार्ग बंदच

Traffic on Kolhapur Ratnagiri Highway resumed but Gaganbawda road remained closed


By nisha patil - 7/23/2024 9:58:30 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत.काल कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग व  कोल्हापूर गगनबावडा मार्ग हे कोकणात जाणारे दोन महत्वाचे मुख्य मार्ग बंद झाले. मुसळधार पावसामुळे गगनबावड्यासह शाहूवाडी तालुक्यातील बहुतांश नद्यांना पूर आलाय.कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर मलकापूर नजीकच्या जाधववाडी आणि निळे या ठिकाणी रस्त्यावर २ फूट पाणी आले होते.त्यामुळे सायंकाळी ७ वाजता वाहतूक करण्यात आली .मात्र आज  पावसाचा जोर कमी असल्याने महामार्गावरील पाणी ओसरलय त्यांमुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ,पुन्हा सुरु झालीय . मात्र कोकणात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेला कोल्हापूर गगनबावडा मार्गावर खोकुरली, मांडूकली येथे रस्त्यावर पाणी आल्याने अद्यापही बंदच आहे.


कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाहतू सुरु मात्र गगनबावडा मार्ग बंदच