बातम्या

चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतुक नियमन आदेश जारी

Traffic regulation order issued during Shravan Shashti Yatra period of Chopdai Devi


By nisha patil - 8/8/2024 5:54:31 PM
Share This News:



चोपडाई देवी यात्रेकरीता महाराष्ट्र तसेच इतर राज्यातुन मोठ्या प्रमाणावर भाविक आपापल्या मोटार वाहनांनी ये जा करत असतात. जोतिबा डोंगरावर येणा-या मोटार वाहनांची प्रचंड संख्या, वाडी रत्नागिरी डोंगर येथील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती पाहता रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटार वाहनांचे पार्किंग होऊन वाहतुकीची कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (C) अन्वये श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2024 रोजी होत असलेल्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्टी यात्रेच्या अनुषंगाने वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत.

श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी या ठिकाणी चोपडाई देवीच्या श्रावण पष्टी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी वर नमुद वाहतुकीची परिस्थिती विचारात घेऊन खालीलप्रमाणे वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेले आहे. नो पार्किंग झोन तयार करण्यात आलेले आहेत तसेच विशिष्ट ठिकाणी चारचाकी आणि दुचाकीकरीता स्वतंत्र पार्किंग ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

यात्रा भरताना व संपल्यानंतर वाहतु‌क प्रवेश बंद, एकेरी वाहतुक करण्यात आलेले मार्ग -

11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 च्या सुमारास यात्रा संपल्यानंतर मोटार वाहने एकाचवेळी मोठ्या प्रमाणात जोतिबा डोंगरावरुन घाट रस्त्याने खाली उतरणार असल्याने टोप, केर्ली फाटा, वाघबीळ, माले फाटा (दानेवाडी), गिरोली गांव या सर्व मार्गावरुन जोतिबा डोंगरावर वाहनांना जाण्यास आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येईल. आरती सोहळा कार्यक्रमाकरीता येणा-या भाविकांनी सकाळी 6 वा. च्या पुर्वीच जोतिबा डोंगरावर जायचे आहे.

घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने केर्ली मार्गे तसेच दानेवाडी फाट्यावरुन वाघबीळ किंवा गिरोली मार्गे कोल्हापुर व इतर ठिकाणी एक दिशा मार्गे जातील.

मालवाहू ट्रक, तीन चाकी प्रवासी व माल वाहतुक रिक्षा तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर जाण्यास दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजीचे 1 वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत प्रवेश बंद करण्यात येत आहे. व्यापा-यांनी आपल्या मालाची वाहतुक यापुर्वीच करुन घ्यावयाची आहे. (पाणी पुरवठा टँकर वगळून)

केलीं फाटा येथे सर्व मोटार वाहनांना (एस.टी. बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) प्रवेश बंद केल्यानंतर जोतिबा डोंगर ते केलीं पार्किंगतळ या दरम्यानची एस. टी. बसेसची वाहतुक दोन्ही बाजुने सुरु राहील.

चोपडाई देवीच्या श्रावण षष्टी यात्रेच्या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी 00.01 वा पासुन दि. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी यात्रा संपेपर्यंत यात्री निवास कॉर्नर पासुन पुढे व यमाई मंदिर कॉर्नर पासुन पुढे दुचाकी मोटार वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

 दि. 10 ऑगस्ट 2024 रोजी 00.01 वा पासुन दि. 11 ऑगस्ट 2024 रोजी यात्रा संपेपर्यंत कोल्हापूर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, माल वाहतुक करणारी वाहने, ट्रॅक्टर्स इ वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर ये जा करणा-या वाहनांनी बोरपाडळे फाटा, कोडोली, वाठार, एन एच ४ राष्ट्रीय महामार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

 नो पार्किंग झोन :-

दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस. टी. बस स्थानक रोड ते जुने एस टी स्टँड ते सेंट्रल प्लाझा समोरील रोड ते पी.डब्ल्यु. डी. रेस्ट हाऊस समोरील रोड ते यमाई मंदिर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्यांच्या दोन्ही बाजुस पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा संपुर्ण भाग नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था :-

यमाई मंदिर पाठीमागील बाजू - दुचाकी

MTDC परिसर -दुचाकी

तळ्यावरील पार्किंग- दुचाकी / चारचाकी

यमाई मंदिर डावी बाजू- चारचाकी

यमाई मंदिर उजवी बाजू- चारचाकी

यमाई मंदिर वळणावरील/यमाई शाळा परिसर- चारचाकी

जुने एस टी स्टँड समोर वळणावर - चारचाकी

पिराचा कडा (टोल नाक्या समोरील पार्किंग)- चारचाकी

तोरणाई कडा- चारचाकी

नवीन एस टी स्टँड आतील बाजू -चारचाकी

नवीन एस टी स्टँड पाठीमागील बाजू- चारचाकी

मेन पार्किंग- अवजड / मोठी वाहने

ग्रामपंचायतीजवळ- आपत्कालीन

सेंट्रल प्लाझा- अवजड / मोठी वाहने

डोंगर माथ्यावरील पार्किंग अपुरे पडल्यास किंवा जोतिबा डोंगरावर जाण्यास एस.टी. बसेस व अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येईल अशा वेळी भाविकांनी आपली सर्व प्रकारची वाहने खालील ठिकाणी पार्किंग करुन स्वखर्चाने एस.टी. बसेसने जोतिबा डोंगरावर जावे आणि यात्रा सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी व भाविकांना होणा-या अडचणी व त्रास टाळण्यासाठी पोलीसांना सहकार्य करावे.

राखीव पार्किंग ठिकाणे :-केर्ली हायस्कुल मैदान, हॉटेल बिलीयन स्टार शेवताई मळा व श्रावणी हॉटेलच्या पाठिमागे पठारावर याप्रमाणे राहिल.

 वरील प्रमाणे प्रवेश मार्ग बंद, सुरु करणे, नो पार्किंग झोन, पार्किंग ठिकाणे यामध्ये परिस्थिती व आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. या अधिसुचनेचे उल्लंघन करणारी व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

 


चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतुक नियमन आदेश जारी