विशेष बातम्या
वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
By nisha patil - 3/15/2025 8:32:41 PM
Share This News:
वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर (दि. 15) – वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला (RTO) दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक पार पडली.
बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी ओव्हरलोडिंगवरील अवास्तव दंडाचा फेरविचार करण्याची सूचना केली. तसेच खाजगी आरटीओ चेक पोस्ट बंद करणे, ट्रक टर्मिनल्स उभारणी, ई-चालान प्रणाली रद्द करणे, एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मुदतवाढ आदी मागण्या लॉरी असोसिएशनने मांडल्या.
या विषयांवर लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. बैठकीस जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि लॉरी असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.
वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक नको – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
|