बातम्या

गरोदरपणात प्रवास करताय ? या गोष्टींची जरूर घ्या काळजी

Traveling while pregnant


By nisha patil - 7/11/2023 7:04:58 AM
Share This News:



 गर्भधारणा हा निःसंशयपणे स्त्रियांसाठी आनंदाचा काळ असतो, परंतु अशा वेळी खूप काळजी घेणे आवश्यक असते. आईच्या प्रत्येक कृतीचा पोटातील बाळावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे या काळात शरीराची, आरोग्याची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेण्याची गरज असते.

तसेच बरीच खबरदारीही घ्यावी लागते. गरोदरपणात महिलांनी खाण्यापिण्याच्या सवयींपासून ते उठण्या-बसण्यापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

त्याच वेळी, जर गरोदरपणात महिलांना प्रवास करावा लागणार असेल तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचे असते. गरोदर असताना प्रवास करणे योग्य की अयोग्य, त्यावेळी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कधी करावा प्रवास ?

गरोदरपणाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रवास करावा, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. हा प्रवास करण्याचाही एक सुरक्षित मार्ग आहे. पण जर एखाद्या महिलेला गर्भधारणेदरम्यान खूप समस्या येत असतील तर तिला कुठेतरी प्रवास करण्यास मनाई केली जाऊ शकते, असे डॉक्टर सांगतात. अशा परिस्थितीत महिलेने ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखवावे, तपासणी करावी. पहिल्या तिमाहीत गर्भपात होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अशा स्थितीत दुसरा त्रैमासिक म्हणजेच ३ ते ६ महिन्यांचा काळ हा गरोदर महिलेच्या प्रवासासाठी चांगला मानला जातो.

तिसरी तिमाही सुरक्षित

सकाळी उठल्यावर होणाऱ्या उलट्या, डोकेदुखी आणि मॉर्निंग सिकनेस याचा त्रास तिसऱ्या तिमाहीमध्ये कमी होता. तेव्हा मूडही चांगला असतो आणि तेव्हा गरोदर महिलांची मनस्थिती चांगली असते.

हे नक्की करा

पण गरोदर असताना कोणत्याही प्रकारच्या सहलीचे अथवा प्रवासाचे प्लानिंग करताना तुमच्या डॉक्टरांचा सल् घेतला पाहिजे आणि आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्या पाहिजेत. तसेच प्रवास करताना घ्यायची महत्त्वाची सुरक्षा, काळजी आणि खबरदारी जाणून घ्या. प्रसूतीची तारीख आणि डॉक्टरांनी दिलेल्या प्रेग्नन्सी रिपोर्ट्स याची एक प्रत नेहमी जवळ बाळगावी.लसीकरण आणि औषध याबद्दलही संपूर्ण माहिती घेऊन त्याची नोंद ठेवावी.


गरोदरपणात प्रवास करताय ? या गोष्टींची जरूर घ्या काळजी