बातम्या

डोळ्याखालील काळी वर्तुळं घावायचीत, ‘हे’ उपचार करा

Treat dark circles under the eyes with this treatment


By nisha patil - 1/20/2024 7:34:38 AM
Share This News:




डोळ्यांखालची त्वचा खूप नाजूक असते. या भागात तैलग्रंथी असतात. त्यामुळे त्याची काळजी घेताना अधिक संवेदनशीलता बाळगावी लागते. अनेक कारणांमुळे डोळ्यांखालची ही त्वचा कोरडी पडू लागते, पातळ होते. यामुळे आपल्या शिरा दिसू लागतात. या शिरा म्हणजे डोळ्यांखालची काळी वर्तुळं. अगदी साध्या उपायांनी ही वर्तुळं कमी करता येतील तसंच डोळ्यांनाही थंडावा देता येईल.

हे घरगुती उपाय करा
यासाठी कापसाचे दोन बोळे काकडीच्या रसात बुडवून ठेवावेत. काकडी थंडावा देत असल्याने उपयुक्त ठरते. रात्री झोपताना किंवा दिवसभरात कधीही हे बोळे डोळ्यांवर ठेवून झोपावं. बदामाच्या तेलाने डोळ्यांलगत मसाज करावा. बटाट्याच्या रसात बुडवलेले कापसाचे बोळेही चालतील. आहारात गायीचं दूध घ्या. दही, मेथी, फिश ऑईल, लोणी असे घटकही आहारात असायला हवेत. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल. ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करावं. भरपूर पाणी प्यावं. फायबरयुक्त आहार घ्यावा. ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा.

आयुर्वेदानुसार आहार आणि औषध
बदललेली जीवनशैली, फास्टफूड, जागरण, सतत कॉम्प्युटर, स्मार्टफोनचा वापर अशा कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो. आयुर्वेदिक उपचारांनी काळ्या वर्तुळांची तीव्रता कमी करता येते. आयुर्वेदानुसार आहार आणि औषधांनी डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांवर नियंत्रण मिळवता येतं.


डोळ्याखालील काळी वर्तुळं घावायचीत, ‘हे’ उपचार करा