बातम्या

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन........

Tribute to the memory of Yashwantrao Chavan the architect of modern Maharashtra


By nisha patil - 11/28/2023 5:57:40 PM
Share This News:



कोल्हापूर- नव महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री व पंचायतराजचे जनक माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त राज्याचे माजी गृहमंत्री आ.सतेज पाटील यांच्या हस्ते व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील व आर.के.पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले..

स्व.यशवंतराव चव्हाण यांनी देशाच्या कृषी,अर्थ,सहकार शिक्षण,सिंचन व संरक्षण सारख्या क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले असुन ते संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. आज त्यांची ३८ वी पुण्यतिथी असल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद आवारात उभारलेल्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून   अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री आ.उल्हास पवार, शिक्षक पदवीधरचे आ.जयंत आसगांवकर,जि.प.चे माजी सदस्य अमर पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अनिल घाटगे व नितीन भाऊ,महिला अध्यक्षा पद्मजा तिवले व आश्विनी माने याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे रामराजे कुपेकर, अशोक पवार,समीर देशपांडे, विराज पवार,गजानन साळोखे, रमेश मोरे,गणेश जाधव,मुसाभाई कुलकर्णी,महादेव पाटील,राजु मालेकर, गणेश नलवडे, सादिक आत्तार, चंद्रकांत सुर्यवंशी, आदित्य निळकंठ, संदिप साळोखे,जयकुमार शिंदे तसेच अरूणा पाटील,निता पाटील व वर्षा भोसले इ.महिला कार्यकर्त्यांसह इतर मान्यवर उपस्थितीत होते.......


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन........