बातम्या

काँग्रेस कमिटीत सर्वपक्षीय शोकसभा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली

Tributes were paid by the political leaders of the district in the all party condolence meeting of the Congress Committee


By nisha patil - 5/26/2024 8:59:45 PM
Share This News:



काँग्रेस कमिटीत सर्वपक्षीय शोकसभा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली

कोल्हापूर : प्रतिनिधी काँग्रेसचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय पी. एन. पाटील साहेब यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता आज  सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थितीत होते.
 
करवीर विधानसभेचे लोकप्रिय स्व.आम.पी.एन.पाटील यांचे गुरुवार दि.निधन झाले. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. यांच्या निधनावेळी जिल्हा बँकेचे संचालक परराज्यात होते. यामुळे आज सर्वपक्षीय शोकसभेचे  कोल्हापूर काँग्रेस कमिटीत आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ,आम.सतेज पाटील, खास.श्रीनिवास पाटील, छत्रपती शाहू महाराज,आम.जयश्री जाधव,आम.ऋतुराज पाटील, आम.जयंतराव पाटील, आम.विनय कोरे, आ.प्रकाश आवाडे,आम.राजू आवळे,राजीव आवळे,मा.आ.के.पी.पाटील, राजीव आवळे,संजीवनी गायकवाड, संजय घाटगे,व्ही.बी.पाटील, आर.के.पवार, आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक मान्यवरांनी स्व.आ.पी.एन.पाटील यांच्या कार्याबद्दल माहिती देऊन श्रध्दांजली अर्पण केली.


काँग्रेस कमिटीत सर्वपक्षीय शोकसभा जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी वाहिली श्रध्दांजली