बातम्या

जनतेकडून राजर्षी शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन...

Triple salute to Rajarshi Shahu Maharaj from the people


By nisha patil - 6/5/2024 12:28:13 PM
Share This News:



राजर्शी शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतीदिनानिमित्त आज सोमवारी टाउन हॉल नर्सरी बागेतील शाहू स्मृतीस्थळांवर शाहू प्रेमी जनतेने अभिवादन केले. दिवसभर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शाहू प्रेमींनी अभिवादन केले. शाहू सलोखा मंचाच्यावतीने १०२ सेकंद शांतता पाळून महाराजांना आदराजंली वाहिली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनेकांनी दर्शन घेतले.

 नर्सरी बागेतील राजर्षी शाहू स्मतीस्थळांवर श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगांवकर, मालोजीराजे, मधुरिमाराजे, यश राजे, यशस्विनी राजे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी मान्यवरांसह उपस्थित शाहूप्रेमींनी राजर्षी शाहू महाराजांच्या १०२ व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून १०२ सेकंद शांतता पाळून आदराजंली वाहिली. यावेळी राजर्षी शाहू महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना सह संपर्क नेते विजय देवणे, आपचे प्रदेश सचिव संदीप देसाई, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, निवृत्त कॅप्टन शिवाजीराव महाडकर,  कॉ. अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, पी.एल. बरगे, मेघा पानसरे, रघू कांबळे, दगडू भास्कर, सदानंद डिगे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, अजय दळवी, उद्योजक तेज घाटगे,  मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, सीए अदित्य बेडेकर, प्रमोद पाटील, वसीम सरकवास, माजी नगरसेवक तौफीक मुल्लानी, माजी नगरसेविका लिला धुमा, चंदा बेलेकर, राजेंद्र दळवी, नितिन जाधव,  शफी मणेर, सुनील देसाई यांच्याह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जनतेकडून राजर्षी शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन...