पण या सालांमध्येही पौष्टिक गुण असतात. या सालांमध्ये आरोग्यापासून सौंदर्यापर्यंत अनेक समस्यांवर उपाय आहेत. पण डाळिंबाची सालं अशीच खाऊ शकत नाही. अशावेळी त्यांचा सालाचा चहा पिऊन पाहा. आज आपण डाळिंबाच्या सालांचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे काय फायदे होतात. हे जाणून घेऊयात. (Pomegranate Peel Benefits In Marathi)
डाळिंबाच्या सालांचे फायदे?
डाळिंबाच्या सालांमध्ये जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात जे हायपरपिग्मेंटेशन (त्वचेचे काळे डाग) वर उपचार करण्यास उपयुक्त असतात. तसंच, डाळिंबाच्या सालीमुळे हृदय आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. डाळिंबाच्या सालीचा रस अँटी इंफ्लामेटरी एजंट म्हणून कार्य करतो जो जास्त वजन आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारतो. या चहामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते.
डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेला चहा तुम्ही नियमित प्यायलात तर रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल, जेणेकरून तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव करू शकाल. त्याचबरोबर, डाळिंबाच्या दाण्यापेक्षा त्याच्या सालीत व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात आढळते.
डाळिंबाचा चहा कसा बनवायचा?
साहित्य
डाळिंबाचे साल, तुळस, दालचिनी,धणे आणि पाणी
कृती
वरील सर्व साहित्य एकत्र करुन पाण्यात उकळवून घ्यावे. तुम्ही घेतलेले पाणी आटून 1 ग्लास होईपर्यंत मंद आचेवर उकळवून घ्यावे. त्यानंतर एका कपात हा चहा गाळून घ्यावा. सकाळी दुधाचा चहा पिण्यापेक्षा असा चहा प्यायल्यास वजन तर कमी होईलच पण रोगप्रतिकारशक्तीही वाढेल