बातम्या
मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न, लवकरच...
By nisha patil - 2/27/2024 4:32:05 PM
Share This News:
मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पुस्तक प्रदर्शन सोहळा पार पडला. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावत मराठी भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात साधारणपणे 15 कोटी मराठी लोकसंख्या आहे. दीड-पावणे दोन कोटी बाहेरचे आहेत, बाकी मराठीच आहेत. काही ठराविक नाटकं, चित्रपट सोडले तर प्रेक्षक पाहायला का जात नाही. आपण सगळ्याच दृष्टीकोनातून कात टाकणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं की, ''जी गोष्ट मला टीव्हीवर मोफत पाहता येते, ती पाहण्यासाठी मी पैसे देऊन चित्रपटगृहात जाणार नाही, त्याव्यतिरिक्त काही मिळालं तर जाईन. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी वाटते, पण तिथेही दणादण चित्रपट आदळत आहेत, कारण लोकांना तोच-तोचपण नको आहे. जे चित्रपट चालले आहेत, ते सहजासहजी टीव्हीवर पाहता येत नाहीत, '' साधारणपणे 30 वर्षांपूर्वी राजकारणी लोक कोकणात जाऊन सांगायचे की, आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि मग लोक त्यांना मतदान करायचे. पण, ज्या दिवशी लोकांनी टीव्हीवर 'बेवॉच' चित्रपट पाहिला, तेव्हा त्यांना कळलं की, हे आपल्याकडे नाही आणि कोणत्याही राजकारणीने आतापर्यंत हे आणण्याचा प्रयत्न केला नाही, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की राजकारणी फसवत आहेत.
त्यामुळे राजकारणी सुधारले, त्याप्रमाणे चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीने कात टाकणं आवश्यक आहे. मराठी भाषा, मराठी चित्रपट, मराठी जे जे काही आहे, ते वृद्धिंगत व्हावं हीच मनापासून इच्छा आहे. त्यासाठी जे काही माझ्याकडून होईल, ते करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन आणि त्यासाठी मला गृहीत धरलं तरी चालेल. मराठी चित्रपटसृष्टीसाठीही काहीतरी करण्याचा प्रयत्न, लवकरच ते समोर येईल. दरम्यान, मराठा भाषा दिनानिमित्त 'तिकीटालय' ॲप लाँच करण्यात आला. मराठी नाटक, चित्रपट आणि कार्यक्रम बुकिंगसाठी तिकिटालय अँप तयार केलं आहे. इतर अँपवर मराठी कार्यक्रम कमी असतात. मात्र या अँप मध्ये सर्व सविस्तर कार्यक्रमाची माहिती आहे.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न, लवकरच...
|