बातम्या
तुळजाभवानी दर्शन मंडप वाद पेटला
By nisha patil - 11/10/2023 7:27:29 PM
Share This News:
नवरात्रोत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला जात आहे. याच मुद्द्यांवरून काही पुजारी आक्रमक झाले आहेत. अशातच उद्या तुळजापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
अवघ्या काही दिवसांवर नवरात्र उस्तव येऊन ठेपला असतानाच महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या तुळजापुरात उद्या बंदची हाक देण्यात आली आहे.तुळजापुरात तुळजाभवानी मंदीर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून सध्या वाद सुरु झाला आहे. दर्शन मंडप हा घाटशीळ येथे करण्यास पुजारी, व्यापारी, आणि स्थानिक नागरिकांचा विरोध आहे त्यामुळेच त्यांनी तुळजापूर शहर बंदचं आवाहन केलं आहे.
तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. सध्या देवीची मंचकी निद्रा सुरू असून,. 15 ऑक्टोबरला देवीची घटस्थापना होणार आहे. नवरात्र उत्सवाची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला जातोय. याच मुद्द्यांवरून काही पुजारी आक्रमक झाले आहेत. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा, अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी आहे. तसेच, दर्शन मंडपाची जागा बदलल्यास व्यापाऱ्यांचं आणि, स्थानिक नागरिकांचं नुकसान होणार असून, त्यासाठी नागरिकांनी विरोध दर्शवला जातोय.
तुळजाभवानी दर्शन मंडप वाद पेटला
|