बातम्या
अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतात तुळशीची पाने
By nisha patil - 6/2/2024 2:53:04 PM
Share This News:
तुळशीतील औषधी गुणांमुळे तुळशीचा समावेश औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. तुळशीच्या सेवनाने शरीरात सकारात्मक उर्जा प्रवाहीत होते व मानसिक दृष्ट्या व्यक्ती प्रबळ होण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, मंजीरीचा आणि खोडाचा वापर औषधी म्हणून करता येतो. जाणून घेऊयात तुळशीच्या पानांच्या फायद्यांबद्दल...
ताप
ताप आल्यावर तुळशीच्या पानांचा रस प्यायल्यानंतर ताप कमी होतो. तसेच तुळशीच्या पानांचा काढाही ताप कमी करण्यास फायदेशीर ठरतो. लहान मुलांना ताप आल्यानंतर तुळशीच्या तेलाने मालिश केल्याने ताप कमी करण्यास मदत होते. तुळशीची पाने कच्ची खाल्याने देखील ताप कमी होण्यास मदत होते.
दातांचं आरोग्य
दातदुखी, कमजोर हिरड्या, दातांतून रक्त येणे, दात किडणे यासर्व गोष्टींसाठी औषध म्हणून तुळशीचा उपयोग केला जातो. दररोज 4 ते 5 तुळशीची पाने तोडांत ठेवल्यास चांगला फायदा होतो. आयुर्वेदामध्येही दातांचे आरोग्य राखण्यासाठी तुळस लाभदायी असल्याचे सांगितले आहे.
तोडांची दुर्गंधी
तुळशीच्या पानांचा उपयोग आपण मुखवास म्हणूनही करू शकतो. तोंडातून दुर्गंधी येणे, चव नसणे, तोंड कोरडे पडणे यांवर उपाय म्हणून तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता. तुळशीच्या पानांमधील पोषक तत्व तोंडात लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास प्रभावी ठरतात. त्यामुळे तुळशीच्या पानांचं सेवन केल्यावर श्वास घेतल्यास ताजंतवानं वाटतं.
त्वचेची काळजी
तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणावर अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्याचप्रमाणे यात व्हिटमिन ए आणि बी असतात भरपूर असतात. त्यामुळे त्वचेवरील इन्फेक्शने, त्वचेवरील खाज दूर करण्यासाठी तुळशीच्या पानांचा फार उपयोग होतो. तसेच तुळशीची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचा टवटवीत होते. तुळशीच्या पानांचा उपयोग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठीही होतो.
मधुमेहावर नियंत्रण
तुळशीमध्ये असलेलं इगेनॉल द्रव्य मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतं. रोज सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने अथवा तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही तुळस गुणकारी मानली जाते. तुळशीमध्ये अनेक गुणकारी तत्वे आढळून येतात. ज्यांमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती, प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत होते. तसेच शरिरातील थकवा दूर करण्यासाठीही तुळस उपयुक्त ठरते.
मेटाबॉलिज्म
तुळशीची पानं आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे मेटाबॉलिज्म सिस्टीम दुरुस्त होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त तुळशीची पानं गॅस एसिडीटीसारख्या डाएजेशन डिसॉर्डरपासूनही आराम मिळवून देतात.
बॉडी डिटॉक्सीफिकेशन
तुळशीच्या पानांमध्ये बॉडी डिटॉक्स करण्याची क्षमता असते. याचे गुणकारी तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.
खोकला-सर्दी
हिवाळ्याच्या दिवसात सर्दी, खोकल्याची समस्या जाणवणं कॉमन आहे. अशा स्थितीत आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुळशीची पानं चघळलीत तर नक्कीच फायदा होईल. तुम्ही काढा किंवा चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करू शकता.
अनेक गंभीर आजारांपासून बचाव करू शकतात तुळशीची पाने
|