बातम्या

ऐन सणासुदीत तूरडाळ झाली महाग

Turdal became expensive during the festive season


By nisha patil - 8/31/2023 5:52:19 PM
Share This News:



मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहेत. बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची बाजारात खरेदी झाली . त्यानंतर त्यावर प्रक्रिया करुन बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. आज किरकोळ बाजारात तुरडाळीचा भाव हा 175 रुपये किलो असून  ऐन सणासुदीत तूरडाळ  महाग झाली  आहे मात्र सामान्यांचे बजेट खोळंबणार.  दोन महिन्यांपूर्वी 100 रुपयांवर असलेली तूरडाळ आता 160 ते 175 रुपये किलोवर गेलीय . हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी 20 ते 30 रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.


ऐन सणासुदीत तूरडाळ झाली महाग