बातम्या

बारा हजार शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ द्यावे : डॉ. चेतन नरके

Twelve thousand farmers should be given subsidy immediately


By nisha patil - 7/18/2024 6:39:20 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हातील साधारण प्रामाणिक  कर्जफेड करणाऱ्या १२ हजार शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान देणे बाकी आहे.ते तात्काळ देण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी निवेदनाद्वारे केली. 
           

राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणारे प्रोत्साहनपर अनुदानापासून कोल्हापूर जिल्हातील बारा हजार पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत. राज्य सरकारने अर्थासंकल्पामध्ये याची तरतूद करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. गेली पाच वर्ष प्रोत्साहन अनुदानाचा खेळखंडोबा सुरु असल्याने शेतकर्यांमध्ये अस्वस्थता आहे. तरी आपण संबंधित यंत्रणेला अनुदान तात्काळ  अडा करण्याबाबत सूचना करावी अशी मागणी डॉ. नरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईतील भेटीत केली. 
           

महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे तुटलेल्या तारांचा धक्का लागून शेतकऱ्यांच्या मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे,अशा घटना होऊ नयेत म्हणून उपाययोजना कराव्यात,तसेच अपघातग्रस्त कुटुंबियांना तत्काळ मदत करावी अशी नरके यांनी मागणी केली.
                     या दोन्ही प्रकरणी सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. .


बारा हजार शेतकऱ्यांचे अनुदान तात्काळ द्यावे : डॉ. चेतन नरके