बातम्या
धम्मलिपीच्या प्रचाराप्रसारासाठी वीस हजार लिप्यांतरीत ग्रंथाच्या प्रती महाविद्यालयामध्ये मोफत वाटणार
By nisha patil - 11/29/2023 7:37:32 PM
Share This News:
कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतातील सर्वच आणि भारताबाहेरील अनेक लिप्यांची जननी असलेली सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या संवर्धनासाठी आणि प्रचाराप्रसारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित मुक्ती कोन पथे? या मराठी भाषणाचा अनमोल ठेवा सम्राट अशोक कालीन धम्मलिपीमध्ये महाराष्ट्रातील धम्मलिपीच्या अभ्यासकांनी लिप्यांतरीत केला आहे. नागरीलिपी ते सम्राट अशोक कालीन धम्मलिपीला जोडणारा आणि धम्मलिपीमध्ये लिप्यांतरीत करून प्रकाशित झालेला हा देशातील पहिला ग्रंथ आहे. ह्याच लिपीतून सर्व भारतीय लिप्या आणि काही परदेशी लिप्या उदय पावल्या आहेत. याचा अर्थ सर्व भारतीय लिप्यांची जननी ही सम्राट अशोक कालीन धम्मलिपी आहे हे आता अभ्यासकांनी सिद्ध झाले आहे. धम्मलिपीच्या प्रचाराप्रसारासाठी हा ग्रंथ एक मैलाचा दगड ठरणार आहे. या लिप्यांतरीत ग्रंथाच्या 20,000 प्रती महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी मोफत वाटल्या जाणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये भगवा फौंडेशनच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी दिली.
मानवाच्या विकासामध्ये भाषा आणि लिपीचा अतिशय महत्वाचा वाटा आहे. या लिपीच्या संवर्धनासाठी हा एक महत्त्वाचा प्रयोग असणार आहे.
हा प्रयोग यशस्वी होण्यासाठी वसईचे आमदार हितेंद्रजी ठाकूर यांनी लागणारा सर्व कागद उपलब्ध करून दिला आहे. तसेच संवाद प्रकाशनच्या प्रमुख प्रा. डॉ. शोभा चाळके यांनी ह्या पुस्तकांच्या छपाईची सर्व जबाबदारी उचलली आहे. पत्रकार परिषदेला ॲड. करुणा विमल, रूपाताई वायदंडे, डॉ. स्मिता गिरी, डॉ. निकिता चांडक उपस्थित होते.
धम्मलिपीच्या प्रचाराप्रसारासाठी वीस हजार लिप्यांतरीत ग्रंथाच्या प्रती महाविद्यालयामध्ये मोफत वाटणार
|