बातम्या

कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक

Two brothers arrested for stealing twowheelers in Kolhapur


By nisha patil - 9/25/2023 5:36:20 PM
Share This News:



महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या आणि दुचाकी चोरणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना शाहूपुरी पोलिसांनी ठोकल्या, त्यांच्याकडून सुमारे एक लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. अश्रफअली नगारजी, सैफ अली नगर जी अशी या दोघांची नावं असून ते बेळगाव जिल्ह्यातील निपाणीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मौल्यवान दागिने आणि मोटरसायकल असा मध्यमाल हस्तगत केला असून हे कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, संदीप जाधव, संजय जाधव, मिलिंद बांगर, लखनसिंह पाटील, शुभम संकपाळ यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.


कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या दोन सख्ख्या भावांना अटक