बातम्या
रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण
By nisha patil - 3/30/2024 8:11:47 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील एम.एस्सी. अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी मयुरी गुरव आणि भक्ती बाटे यांनी नुकत्याच झालेल्या पदवीधर अभियोग्यता चाचणी-२०२४ अर्थात गेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.
राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक काठिण्यपातळी असणारी परीक्षा म्हणून गेट ओळखली जाते. अशा परीक्षेत या विद्यार्थिनींनी यश मिळविले आहे. मयुरी गुरव ही भुदरगड तालुक्यातील दुर्गम दिंडेवाडी गावची असून तिने शिवराज कॉलेज, गडहिंग्लज येथून बी.एस्सी. शिक्षण पूर्ण केले आहे. भक्ती बाटे मूळची कोल्हापुरातील फुलेवाडी येथील असून एम.एस्सी. (ऑरगॅनिक केमिस्ट्री) केले आहे. या यशाबद्दल या दोघींचेही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, अधिविभाग प्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.
रसायनशास्त्राच्या दोन विद्यार्थिनी ‘गेट’ परीक्षा उत्तीर्ण
|