बातम्या
अजित पवार गटाचं आज कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीर
By nisha patil - 11/30/2023 1:56:07 PM
Share This News:
अजित पवार गटाचं आज कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीर
अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार
या शिबिरामध्ये माजी आमदार माजी खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कर्जतमध्ये राष्ट्रीय कार्यकारणी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाच्या वतीने कर्जतमध्ये आज दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या शिबिरामध्ये माजी आमदार माजी खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं आहे. शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची तयारी करण्यात येणार आहे.
आज संध्याकाळी अजित पवार राष्ट्रीय कार्यकारणी गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी सुरू असताना आज अजित पवार यांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणे यासोबत अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून या बैठकीत सहभागी होणे महत्त्वाचे मानलं जात आहे.
अजित पवार गटाचं आज कर्जतमध्ये दोन दिवसीय शिबीर
|