बातम्या

राष्ट्रीय नामांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे चमकले

Two from Kolhapur shone in the National Nomination Tennis Tournament


By nisha patil - 11/8/2023 9:43:30 AM
Share This News:



राष्ट्रीय नामांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे चमकले

बिल्लाबाँग इंटरनॅशनल स्कूल नोएडा,  च्या मैदानावर झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचा  के.डी. एल.टी.ए. खेळाडू अथर्व डकरे व पुण्याचा अर्णव भाटिया यांना उपविजेतेपद मिळाले. चुरशीच्या अंतिम फेरीत त्यांना उत्तर प्रदेशच्या अनय पांडे व अरमान दुवा यांच्याकडून 6-2,2-6, 3-10 असा पराभव पत्करावा लागला. उपांत्य फेरीत त्यांनी अर्जुन कक्कर व अनिकेत सिंग यांचा 6-3,6-4, उपांत्य फेरीत त्यांनी द्वितीय मानांकित दिल्लीच्या देवांश सिंग व तनिष गुरेजा या जोडीचा 7-6(7-5),7-5 असा पराभव केला. पहिल्या फेरीत त्यांनी शौर्य शर्मा व गौरीश खुराना या जोडीचा 9-3 असा पराभव केला.


राष्ट्रीय नामांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरचे दोघे चमकले