बातम्या

दोघा मोटारसायकल चोरट्यांना अटक - सहा मोटारसायकली जप्त

Two motorcycle thieves arrested  six motorcycles seized


By nisha patil - 6/9/2024 12:43:53 PM
Share This News:



करवीर तालुक्यातील  दिंडनेर्ली फाटा येथे चोरीतील मोटारसायकली विक्री साठी आलेल्या ऋषीकेश उर्फ गणेश उमेश पाटील (वय 24.रा राधानगरी) आणि अक्षय चंद्रकांत पाटील (वय 29.रा.शिरगाव ,ता.राधानगरी) या दोघां चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली . त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमंतीच्या सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.त्यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात एक,इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दोन ,शाहुवाडी पोलिस ठाण्यात एक आणि पंढ़रपूर शहर पोलिस ठाण्यात एक असे पाच गुन्हे उघडकीस आणले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,उपनिरीक्षक चेतन मसुटगे पोलिस बालाजी पाटील,संजय हुबे,सतिश जंगम,कृष्णात पिंगळे,अमित मर्दाने,वसंत पिंगळे यांनी केली.


दोघा मोटारसायकल चोरट्यांना अटक - सहा मोटारसायकली जप्त