बातम्या
राधानगरी तालुक्यातील मांगोली व ठिपकुरली येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
By nisha patil - 1/2/2025 3:36:16 PM
Share This News:
राधानगरी तालुक्यातील मांगोली व ठिपकुरली येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
राधानगरी तालुक्यातील मांगोली आणि ठीकपुरली येथे पाण्यात बुडून झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. शुक्रवारी 31 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनांमध्ये मांगोली येथील दत्तात्रय ईश्वरा पाटील यांचा व ठिपकुरली येथील वैशाली सर्जेराव कांबळे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय.
.jpg)
मांगोली येथील दत्तात्रेय पाटील हे येथील आपल्या नावली नावाच्या शेतामधील ऊस पिकाला पाणी पाजण्यासाठी गेले असता विहिरीवरील मोटार चालू करत असताना पाय घसरून विहिरीत पडले. ही घटना समजल्यानंतर त्यांना उपचाराकरिता सोळांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तर ठिकपूरली येथील वैशाली सर्जेराव कांबळे ही चाळीस वर्षीय महिला सकाळी साडेदहाच्या सुमारास कॅनॉल मध्ये कपडे धुण्याकरिता गेली असता पाय घसरून पडल्यामुळे मृत झाल्याची दुसरी घटना घडली.त्यांनाही उपचार करता सोळांकुर रुग्णालयात नेल असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.या दोन्ही घटनांची नोंद राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये झालीय.
राधानगरी तालुक्यातील मांगोली व ठिपकुरली येथे पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
|