बातम्या

काळम्मावाडी धरणात निपणीतील दोघे पर्यटक बुडाले.

Two tourists from Nipani drowned in Kalammavadi dam


By nisha patil - 1/7/2024 9:57:48 PM
Share This News:



राधानगरी परिसरातील काळम्मावाडी धरण पाहण्यासाठी आलेले दोन पर्यटक वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी दुपारी घडलीय.गणेश चंद्रकांत कदम वय 18 आणि प्रतिक पाटील वय 22 अशी वाहून गेलेला युवकांची नावे आहेत.

कर्नाटकातील निपाणी येथील 13 जण आज काळम्मावाडी धरण पहाण्यास आले होते.यापैकी गणेश कदम आणि प्रतिक पाटील हे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आल्याने वाहून गेले.

घटनेची माहिती समजताच राधानगरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तर रेस्क्यु फोर्सच्या मदतीने वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू करण्यात आलाय.


काळम्मावाडी धरणात निपणीतील दोघे पर्यटक बुडाले.